Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Rain Alert : राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
    जळगाव

    Rain Alert : राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    saimatBy saimatMarch 20, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / मुंबई  / प्रतिनिधी

    गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगावसह राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्यात अद्यापही अवकाळी पावसाचे सावट कायम आहे.

    भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

    सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    दरम्यान, विदर्भ आणि मराठवाडा भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. गुरुवारी वाशीम येथे ३८.४ अंश, जळगाव येथे ३७ अंश आणि अकोला येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली, तर धुळे येथे नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

    खान्देशात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाने हजेरी लावली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात गारपीट झाली, तर नंदुरबारातील धडगाव तालुक्यात सातपुडा परिसरातील अनेक गावांमध्ये रात्री जोरदार पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला.

    या अवकाळी पावसामुळे ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा यांसह लिंबू आणि केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या उरलेल्या आशांनाही मोठा धक्का बसला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Premium Petrol Price Today Updates : जागतिक तेल किंमती वाढल्यामुळे भारतात प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ; साध्या पेट्रोल व डिझेलवर परिणाम नाही

    March 20, 2026

    Nandurbar : कृषी अधिकारी कार्यालयातील २० लाखांचा GST घोटाळा; कर सल्लागारासह आरोपींविरुद्ध गुन्हा

    March 20, 2026

    Mumbai : मालाडमध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; बांधकाम सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.