साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाटणा येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी नंबर १ येथे महिला डॉक्टर, दोन कंपाऊडर आहेत. त्यांनी गेल्या २२ सप्टेंबर २०२३ रोजी पाटणा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना पत्राद्वारे नवीन नळ कनेक्शन द्यावे आणि गावातील काही नागरिक तेथेच शौचास बसत असल्याची तक्रार केली आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्यातील दरवाजे, खिडक्यांची काही जण तोडफोड करतात. यासोबत मद्यपी मद्यप्राशन करुन बाटल्याही फोडतात. त्याचा त्रास दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी महिला कर्मचारी डॉक्टरांनी सरपंचांसह ग्रामसेवकांना लेखी पत्र दिले आहे. मात्र, लेखीपत्र देऊनही त्याची अद्यापही दखल घेतलेली नाही. यासंदर्भात सरपंच, ग्रामसेवकांनी लेखीपत्राची त्वरित दखल घेऊन नवीन नळ पाईपलाईन देण्याची मागणीही पत्राद्वारे केली आहे.