यावल न.प.मुकादम यांची बेशिस्त वागणूक, पोलिसांसह मुख्याधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांची लेखी तक्रार

0
39

यावल पो.स्टे.ला अदखलपात्र गुन्हा दाखल

साईमत/यावल/प्रतिनिधी :

येथील नगरपरिषदेच्या कार्यालयात सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सवानिमित्त नगरपरिषद कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात मुकादम शेख मोबीन शेख रशीद या कर्मचाऱ्यांनी बेशिस्त वागणूक केल्याने यावल नगरपरिषद पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांच्यासह नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि यावल पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत काल रात्री उशिरा मुकादम शेख मोबीन यांच्याविरुद्ध अदाखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

लेखी अर्जात म्हटले आहे की, नगरपरिषद आरोग्य विभाग ऑफिसमध्ये आरोग्य, पाणी पुरवठा, बांधकाम, विद्युत विभाग कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांच्यासोबत नवरात्री सण उत्सवनिमित्त ३० रोजी दुपारी १२.३० वाजता बैठक घेण्यात आली. त्यात संबंधित विभाग संदर्भात कामाचे नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. आरोग्य विभागाबाबत शहरातील नागरिकांच्या सुव्यवस्था सोईनुसार नियोजनाबाबत चर्चा सुरु असता मागील महिन्याच्या गणपती विसर्जनाबाबत कामाचे नियोजन ठरले होते.त्यात सफाई कर्मचारी यांची विसर्जन कुंड, विसर्जन मार्ग आणि निर्माल्यकरिता ट्रॅक्टर ट्रॉलीचे नियोजन करण्याबाबत कार्य सोपवलेले होते. परंतु संबंधित कर्मचारी मुकादम शेख मोबिन शेख रशीद यांनी मागच्या वेळेस कामचुकारपणा केलेले असल्यामुळे त्यांना महिन्याभरात किती मोकाट जनावरे गुरे-ढोरे पकडले, किती दंड वसूल केला. तसेच प्लास्टीक बंदी मोहिम किती विक्रेत्यांकडून दंड वसूल केला, अश्या विविध विषयांवर चर्चा सुरु होती.

येत्या नवरात्री सण उत्सवानिमित्त कामाचे नियोजनासाठी चर्चा सुरु असताना कर्मचारी शेख मोबिन शेख रशीद यांनी सांगितले की, आताचे प्र.मुकादम कल्पना घारू हे २ दिवस झाले आलेले आहे. तुम्ही त्यांचे ऐकतात मी सिनियर मुकादम आहे. कल्पना घारू या मला ज्युनियर आहेत.सर्व कामे मी माझ्या हिशोबाने करेन. २९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता यावल पोलीस स्टेशन येथून बुरुज चौकात अनधिकृत झेंडे काढण्याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता अभियान सत्यम पाटील यांना अधिकाऱ्यांचा दूरध्वनीवर कॉल आला. तेव्हा त्यांनी झेंडा काढण्याबाबत मौ.कल्पना घारू यांना मुकादम शेख मोबिन शेख रशीद यांना कॉल करून झेंडा सोबत काढण्याबाबत कळविले होते. यावेळी शेख मोबिन शेख रशीद हे स्वतः झेंडा काढण्याबाबत गेले नाहीत. संपूर्ण काम श्रीमती कल्पना घारु यांनी हाताळले. विषय बैठकीत आला असता ‘मी माझ्या सोयीने कामे करेल. मला कुणीही वरिष्ठ नाही. मी माझ्या मनाला पटेल ते करेल व तुला जे करावयाचे आहे ते करून घे तुझ्याने माझे काहीच होऊ शकत नाही’ याबाबत सत्यम पाटील शेख मोबिन यांना उद्देशुन बोलले त्यावर सत्यम पाटील त्यांना बोलले की, “भाषा नीट वापरा हे कार्यालयीन शिस्तीना धरून नाही तुम्ही नीट भाषा वापरा. व तुम्हाला वाद घालायचा आहे का ?” त्यानंतर संबंधित कर्मचारी मुकादम शेख मोविन शेख रशीद यांनी आरोग्य विभागात बैठकीत श्रीमती कल्पना बबलु घारू (प्रभारी मुकादम) व श्रीमती नेहा रजाणे (शहर समन्वयक) या महिला कर्मचारी बैठकीत उपस्थित असताना सत्यम पाटील साहेबांना विविध घाण शब्दात संभाषण केले. तु “कॅबिन के बाहर निकल तुझे देखता मैं” त्यानंतर न.पा.कर्मचारी दादु धोत्रे यांनी शेख मोबिन शेख रशीद यांना कॅबिन बाहेर काढले असता न.पा. कर्मचारी दादु धोत्रे यांच्या बाहेरील कॅबिनला दरवाजाजवळ लावलेला दगड उचलून मारण्यासाठी उगारत होता आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यात सत्यम पाटील ‘तुझे काट दूंगा’ असे उच्चारले व त्यावेळेस न.पा. कर्मचारी दादु धोत्रे यांनी मुकादम शेख मोबिन शेख रशीद त्यांचे दोन्ही हात घट्ट पकडून त्यांच्या हातांमधील दगड न.पा.कर्मचारी कामीलउद्दीन शेख यांनी हिसकावून घेतले व दादु धोत्रे यांनी मुकादम शेख मोबिन शेख रशीद यांना वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर घेऊन गेले असे वरीलप्रमाणे घटना घडलेली आहे. सर्व घटना कार्यालयात असलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरा समोर घडलेली आहे. कर्मचारी शेख मोबिन शेख रशीद यांनी कार्यालयीन शिस्तीचे उल्लंघन केलेले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासकीय नियमान्वये कार्यवाही व्हावी. तसेच वरिष्ठ सोबत चुकीची वागणूक व जीवे मारल्याची धमकी दिल्याबद्दल जीवाचे कमी जास्त झाल्यास शेख मोबिन शेख रशीद हे जबाबदार राहतील. कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती यावल नगरपालिकेतील उपस्थित अधिकारी, कर्मचारी सत्यम पाटील, राजेंद्र गावंडे, शुभम भांडे, दादू धोत्रे, कामीलउद्दिन शेख, कल्पना घारू, अजय मेढे, स्नेहा रजाने, ज्ञानेश्वर मगर, विजय मराठे, सचिन पाटील यांनी करून माहितीस्तव जिल्हाधिकारी, यावल नगरपरिषद प्रशासक तथा प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशनला शेख मोबीन शेख रशीद यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here