भुसावळला भोळे महाविद्यालयात ‘उन्नत अभिवृध्दी योजना’ शिबिर

0
16

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात बुधवारी, १७ जानेवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे जळगाव जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या पदाचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्‍यक असणारे ‘उन्नत अभिवृध्दी योजना’ मूल्यमापन शिबिर घेण्यात आले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांना शासनाच्या आदेशानुसार मूल्यमापन करण्यासाठी आयोजित शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.एस.टी.इंगळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. याप्रसंगी शासनाचे प्रतिनिधी म्हणून नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे वरिष्ठ प्राध्यापक प्रा.डॉ.सी.पी.चौधरी, प्रा. डॉ सुनील आर.पाटील तसेच मूल्यमापन शिबिराचे समन्वयक म्हणून प्रा.डॉ.संजय चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष स्व. दादासाहेब देविदास नामदेव भोळे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन तसेच सरस्वती पूजन आणि दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले.

शिबिरात प्रा.डॉ.एस.टी.इंगळे, प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिरात जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विविध विषयांच्या १२२ प्राध्यापकांच्या ॲकेडमिक लेव्हल १० ते ॲकेडमिक लेव्हल ११ आणि ॲकेडमिक लेव्हल ११ ते ॲकेडमिक लेव्हल १२ चे प्रस्ताव मूल्यमापनासाठी तपासण्यात येवून त्यांची शिफारस पदोन्नतीसाठी केली आहे.

यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.संजय चौधरी, प्रा.डॉ.राजेश ढाके, डॉ.संजय चौधरी, प्रा.आर.डी.भोळे, डॉ.अनिल सावळे, डॉ.जयश्री सरोदे, प्रा.श्रेया चौधरी, डॉ.अंजली पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.एस.एस.पाटील, प्रा. दीपक जैस्वार, प्रा.धनश्री नेहते, प्रा.कामिनी चौधरी, प्रा.जागृती सरोदे, प्रा.आरती नवघरे, प्रा.आरती भोई, प्रा.सुशीला बाटे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.के.व्ही.धांडे, पराग पाटील, वाय. डी.चौधरी, राजेश पाटील, प्रमोद नारखेडे, किरण पाटील, मिलिंद नेमाडे, ललित झोपे, सुधाकर चौधरी, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, दीपक महाजन, विजय पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेे.

कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा. डॉ.आर.बी.ढाके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.दयाघन एस.राणे तर आभार प्रा. डॉ.माधुरी पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here