थायलंडला संयुक्त राष्ट्र कौन्सिलचा वैशाख महोत्सव उत्साहात

0
19

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

बँकॉक येथे संयुक्त राष्ट्र कौन्सिलच्यावतीने थायलंड बँकॉक येथे १९ व २० तारखेला आयोजित वैशाख महोत्सव कार्यक्रमाला भारतातून धम्मकार्यात कार्यरत डॉ.अ.फ. भालेराव (साहित्यिक) उपस्थित होते. यावेळी भदंत विरत्न महाथेरो, सिने अभिनेते डॉ.गगन मलिक यांची उपस्थिती होती. वैशाख पौर्णिमेला बुद्धांचा जन्म झाला. तसेच ज्ञान प्राप्तीही झाली. बुद्धांचे महापरिनिर्वाण ही वैशाख पौर्णिमेला झाले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने १९९९ मध्ये आपल्या आमसभेत संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून मान्यता दिली आहे. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्य कार्यालयात २००१ या वर्षात साजरा केला होता. इंटरनॅशनल कौन्सिल फॉर वैशाख दिन ज्याला युनायटेड नेशन इकॉनोमिक व सोशल कौन्सिल सह सल्लागार दर्जा मिळाला आहे. १९ वा संयुक्त राष्ट्र दिवस वैशाख महोत्सव १९ व २० मे २०२४ रोजी थायलंड देशात आयोजित केला होता.

महोत्सवाचे आयोजन अयुथ्या येथील महाचुलालोंग कॉर्न राजा टोरियम हॉल व बँकॉक येथील संयुक्त राष्ट्र परिषद केंद्र महा मुकुंट बौद्ध विद्यापीठ थायलंड येथील सांस्कृतिक मंत्रालयाच्या धार्मिक व्यवहार विभाग आणि बौद्ध धर्माचे कार्यालय हे प्रमुख आयोजक होते. सर्वोच्च संघ परिषद आणि रॉयल सरकारच्या माध्यमाने हा १९ वा संयुक्त राष्ट्र दिवस विश्‍वास आणि एकता निर्माण करण्याचा बौद्ध मार्ग या विचाराने साजरा करण्यासाठी आयोजित केला जात आहे.

कार्यक्रमाला महाराष्ट्रातून डॉ. हत्ती अंबिरे, सुलेखाताई कुंभारे (माजी मंत्री), डॉ.अ.फ.भालेराव, प्रा. छबन गडकर (पुणे), डॉ.सुखदेवे (चंद्रपूर), विनय बोधी (नागपूर) यांचीही उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here