साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील एका भागात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या तीन महिन्यांपासून धमकी देत तिच्यावर अत्याचार करत तिला गर्भवती केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, अमळनेर शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, त्याच परिसरात विशाल बाबुराव कोळी(वय२०) हा राहतो. १३ जुलै ते १७ सप्टेंबर दरम्यान विशाल कोळी याने पीडित मुलीला तिच्या लहान भावाला जीवे ठार मारण्याची धमकी तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी ही गर्भवती राहिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांना धक्काच बसला. पीडित मुलीला सोबत घेऊन तातडीने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विशाल बाबुराव कोळी यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहे.