प्रधानमंत्री फळ पिक विमा योजनेअंतर्गत पिकविमाधारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार

0
16

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची माहिती

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी

पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार २०२३-२४ मधील फळ पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार ऑक्टोबर ते मार्च कालावधीमध्ये जळगाव जिल्ह्यातील ८४ महसूल मंडळात सलग पाच दिवस तापमान ४५ डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे नुकसान भरपाई मंजूर होणार आहे.

तसेच यापूर्वी जानेवारी महिन्यात सलग तीन दिवस कमी तापमानामुळे विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. असे कमी व जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसान भरपाईची ३२७ कोटी ५५ लाख एवढी एकत्रित रक्कम लाभ काही दिवसात जळगाव जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या कार्यालयातून कळविण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here