मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात “संवाद उपक्रमांतर्गत”

0
13

जळगाव : प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली “ संवाद -उपक्रम ” या अभिनव उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांनां देण्यात येणाऱ्या सोई-सुविधा व विविध प्रश्नांबाबत समाधान शोधण्याच्या उद्देशाने योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांनी दि. २७.०७.२०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भुसावळ येथे तर इतर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यां समवेत रात्रभर मुक्काम करून विद्यार्थ्यांशी संवाद साधत अडी-अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

संवाद उपक्रमांतर्गत सहायक आयुक्तांनी विद्यार्थ्यांसोबत सामुहिक भोजनाचा आस्वाद घेत विविध विषयांबाबत संवाद साधला. वसतीगृहाअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोई-सुविधा, भविष्याच्या दृष्टीकोनातून उपयोगिक विविध तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान व कौशल्य विकास कार्यक्रम इ. बाबत मनमोकळे पणाने विद्यार्थ्यांशी संवाद साधत अडी-अडचणी जाणून घेत विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात विशेष आवड निर्माण व्हावी या दृष्टीने वसतिगृहात उपलब्ध टेबल टेनिस व इतर खेळ विद्यार्थ्यां समवेत खेळले. समाज कल्याण विभागांतर्गत प्रथमच राबविण्यात येणाऱ्या “ संवाद -उपक्रम ” या संकल्पनेमुळे विद्यार्थी भारावून जात मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करीत आहेत.
सहायक आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्या बरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास कार्यक्रम व विविध तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करणे बाबतच्या सूचना संबंधित गृहपाल यांना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here