Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»‘आपली आस्था…आपले मंदिर’ अंतर्गत पत्र्या हनुमान मंदिर केले स्वच्छ
    जळगाव

    ‘आपली आस्था…आपले मंदिर’ अंतर्गत पत्र्या हनुमान मंदिर केले स्वच्छ

    SaimatBy SaimatJanuary 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव जळगाव

    देशवासियांचे श्रध्दास्थान असलेले अयोध्येतील प्रभु श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त जळगावात गेल्या ४ दिवसांपासून ‘आपली आस्था…आपले मंदिर’ अंतर्गत स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून मंगळवार दि. १६ जानेवारी रोजी बळीरामपेठ येथील पत्र्या हनुमान मंदिराची स्वच्छता करण्यात आली.

    अयोध्येतील प्रभु श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ झाला. यानिमित्ताने जळगावात विविध उपक्रमांना उधाण आले आहे. शहरातील ३९९ वर्षे जुने असलेल्या बळीरामपेठेतील पत्र्या हनुमान मंदिरात मंगळवार दि. १६ जानेवारी रोजी आ. सुरेश भोळे (राजूमामा) व मित्र परिवारांच्या हस्ते स्वच्छता करण्यात आली.

     

    या उपक्रमात युवक मंडळाने ही स्वच्छता मोहीम हाती घेतली असून गेल्या ३ दिवसात ५० हून अधिक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली आहे. दरम्यान, अयोध्येत जय्यत तयारी सुरू असून सर्व जळगाववासीयांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही गरज भासल्यास राजूमामा संपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असेही आ. भोळे यावेळी म्हणाले.
    यावेळी आ. राजूमामा भोळे व मित्र परिवार यांच्याबरोबर पवन महाराज, राहुल घोरपडे, महेश चौधरी, राजू मराठे, विशाल त्रिपाठी, जगदीश जोशी, जयेश भावसार, चित्रा मालपाणी, विजू पिंगळे, उदय भालेराव, रणजीत भाईजी, संजय सोनवणे, चंद्रकांत शिंदे, संजय भावसार, नंदू महाजन, संजय गवळी, हर्षल चौधरी आदिंची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    March 22, 2026

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    March 22, 2026

    Bhusawal : विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ; माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.