मनपासह संबंधित नगरसेवकांचे झाले दुर्लक्ष
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळ्यातील सहयोग कॉलनीतील हरीकृष्ण मंदिराजवळच गेल्या पंधरा दिवसांपासून अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध आजारांना आमंत्रण द्यावे लागत आहे. तसेच अस्वच्छतेमुळे परिसरात डासांची उत्पत्तीही प्रचंड वाढली आहे. याकडे मनपाच्या स्वच्छतेसह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
परिसरात येणारी मनपाची घंडागाडीही अवेळी येत असल्याने नागरिक नाईलाजास्तव केरकचरा रस्त्यावर टाकत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. त्यामुळे रस्त्यावरच अस्वच्छता पसरल्याचे चित्र आहे. यासोबतच परिसरातील गटारींचीही वेळोवेळी स्वच्छता केली जात नसल्याने त्याचाही परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. वार्ड क्रमांक दहाच्या संबंधित नगरसेवकांनीही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.