साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने भुसावळचे उमेश नेमाडे यांची रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी श्री. नेमाडे यांचे सहकार्य राहील, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
यावेळी मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, रवींद्र नाना पाटील, गुणवंत नीळ आदी उपस्थित होते.
