उबाठा शेतकरी शिवसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
49

वैशालीताई सूर्यवंशी यांचे ग्रामीण भागात ढोल ताशांच्या गजरात स्वागत

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

मतदारसंघातील सर्वसामान्यांसह देशाचा पोषणकर्ता शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी आणि थेट बळीराजाशी संवाद साधण्यासाठी शिवसेना-उबाठाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी पाचोरा – भडगाव मतदारसंघांत शेतकरी शिवसंवाद यात्रेचे नियोजन केले आहे. शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची ९ सप्टेंबरपासून पाचोरा तालुक्यातून सुरूवात झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘शेतकरी शिवसंवाद यात्रा’ नगरदेवळा- बाळद जिल्हा परिषद गटातून सुरू झाली. पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात पाचोरा तालुक्यातील निपाणे, मेहुलाई तांडा, बदरखे, बदरखेतांडा व आखतवाडे या गावांमध्ये शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. दुपारच्या सत्रात पिंपळगाव, संगमेश्वर, चुंचाळे, नगरदेवळा सीम आणि धनगरवाडी आदी गावांमध्ये संवाद साधला.

संवाद यात्रा दरम्यान त्यांनी प्रत्येक गावातील विविध देवस्थानांमध्ये तसेच विविध गणेश मंडळांनी स्थापन श्री गणेशाचे दर्शन घेतले. गावातील आबालवृध्दांशी संवाद साधला. ग्रामीण भागातील अडचणींबाबत विस्तृत चर्चा केल्या. प्रामुख्याने गावासह परिसरातील न झालेली विकासकामे आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत ग्रामस्थांनी अडचणी सांगितल्या. आपण भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द आहे.सध्याची दडपशाही, टक्केवारी, ठेकेदारी राजकीय स्थिती बदलण्यासाठी पाचोरा मतदारसंघात परिवर्तनाचा लढा देत आहे. जनतेने परिवर्तनाच्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन वैशालीताई सूर्यवंशी जनतेला करीत आहे.

अडचणींबाबत अनेकांनी मांडले गाऱ्हाणे

शेतकरी शिवसंवाद यात्रेत निपाणे येथील सरपंच संजय पाटील, भिकन पाटील, दत्तात्रय पाटील, नाना पाटील, सुदाम पाटील, वाल्मीक पाटील, अण्णा टेलर, किशोर पाटील , मेहुलाई तांडा येथे विकास राठोड, विनोद राठोड, तोताराम राठोड, योगेश जाधव, मलखाम राठोड, अंबरसिंग जाधव आणि महेंद्र मंगलसिंग परदेशी, बदरखे येथे भूषण पाटील, गणपत गढरी, सुधाकर गढरी, राहूल पाटील, मेघनाद पाटील, संजय गढरी, दिलीप गढरी, गणपत पाटील आदींनी तर बदरखे तांडा येथे सुशीला राठोड, बाळू सर, भरत राठोड, अशोक पंडित चव्हाण, अनिता राठोड, शरद राठोड, आखतवाडे येथे भैय्या पाटील, बापू गढरी, अजय पाटील, वाहिद पठाण, रमेश गढरी, शाकीर शेख आदींसह गावातील आबालवृध्दांनी वैशालीताई सूर्यवंशी यांच्यासमोर त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत गाऱ्हाणे मांडले. ताईंनी सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.

यात्रेत यांचा होता सहभाग

शेतकरी शिवसंवाद यात्रेत वैशाली सूर्यवंशी यांच्यासोबत उध्दव मराठे, अरूण पाटील, शरद पाटील, बालूअण्णा, राजेंद्रसिंग देवरे, प्रशांत पाटील, अजय चौधरी, प्रमोद नाना, योजना पाटील, कुंदन पांड्या, जयश्री येवले, लक्ष्मी पाटील, अनिता पाटील, मनीषा पाटील, निता भांडारकर, उषा परदेशी, गायत्री बिरारी, दत्तू भोई, योगेश समारे, सोमनाथ भोई, मुकेश राजपूत, मनोज गुरव, अनिल शिंपी, रवींद्र महाजन, विकी जाधव, रामचंद्र महाजन, पांडुरंग भामरे, नाना सोनजी, अशोकबापू, भैय्यासाहेब, अविनाश पाटील, बंटी गायकवाड, राहूल गायके, बंटी पाटील, शशिकांत पाटील, बंडूनाना, भूषण शिंदे, रतन पाटील, करण गायकवाड, संदीप पाटील, सागर देवरे, स्वरूप राजपूत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here