दुचाकीचा अपघात ; आई व मुलगा जखमी

0
28

जळगाव : प्रतिनिधी

पुढे जाणाऱ्या कारने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या दुचाकी आदळल्याने यात दुचाकीवरील महिलेसह मुलगा जखमी झाल्याची घटना भुसावळ रोडवरील राष्ट्रीय महामार्गावरील कपूर पेट्रोल पंपाजवळ घडली. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की,मुक्ताईनगर तालुकयातील इच्छापूर येथील रहिवासी सुमाबाई लक्ष्मण बेलदार (वय-५०) ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार २७ जून रोजी सुमाबाई ह्या आपल्या मुलगा गोपाळसह दुचाकी (एमएच १९ सीएच २८३१) ने जळगावात आल्या होत्या. काम आटोपून पुन्हा जळगावून इच्छापूर येथे दुचाकीने जात होते. गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढे असलेल्या कपुर पेट्रोल पंपाजवळून दुपारी ३ वाजेच्या सुमारास जात असतांना त्यांच्या दुचाकीच्या पुढे (एमएच ०४ एफएफ ४५८२) क्रमांकाची कार जात होती. पुढे जाणाऱ्या कारने अचानक ब्रेक मारल्याने मागुन दुचाकी कारवर आदळली गेली. यात सुमाबाई बेलदार आणि त्यांचा मुलगा गोपाळ बेलदार हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सुमाबाई बेलदार यांच्या फिर्यादीवरून रात्री ११ वाजता नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here