दोन महिलांचा जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग

0
30

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

येथे दोन महिला आणि पुरूषाला जातीवाचक शिवीगाळ करत दोन महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरूवारी, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन महिला आणि पुरूष हे बुधवारी, ९ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील शामखेडा शिवारातील शेतकरी बिपीन जगन्नाथ तिवारी (रा. धरणगाव) शेतात काम करत होत्या. त्यावेळी बिपीनने शेतात काम करणाऱ्या महिला आणि पुरूषांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने महिलांना अश्लिल शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर गुरूवारी, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता महिलांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिपीन तिवारी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक सुनील नांदवळकर करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here