Container In Shiv Colony : शिव कॉलनीत कंटेनरच्या धडकेत दुचाकी घसरली; तरुण गंभीर जखमी

0
3

रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

भरधाव कंटेनरने दुचाकीला कट मारल्याने दुचाकी घसरली होती. त्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात बुधवारी, ४ जून रोजी रात्री महामार्गावरील शिव कॉलनीजवळ घडला. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. रोहित श्रीराम बारी (वय ३०, रा. हरिविठ्ठल नगर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शहरातील फुले मार्केटमध्ये कापडाचा व्यवसाय करणारे रोहित बारी बुधवारी रात्री दुचाकीने (क्र.एमएच १९, डीके २७९०) घरी जात होते. मागून येणाऱ्या कंटेनरने (क्र.एमएच १९, सीएक्स २२५९) दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकी घसरली. त्यात रोहित हा खाली पडला. खाली पडल्यामुळे त्याच्या पोटाला, डाव्या पायाला, कंबरेला व इतर ठिकाणी दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथून त्यांना मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, रोहित बारी यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. हेमंत कळसकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here