Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेरला मतदान जनजागृतीसाठी सायकलसह दुचाकी रॅली उत्साहात
    जळगाव

    रावेरला मतदान जनजागृतीसाठी सायकलसह दुचाकी रॅली उत्साहात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 4, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    रावेर लोकसभा मतदार संघांमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सहा निवडणूक अधिकारी देवयानी यादव यांच्या नेतृत्वाखाली सर्व मतदान जनजागृतीकरीता सायकल व मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीचे नियोजन तहसीलदार बंडु कापसे यांनी केले होते. याप्रसंगी संचलन दीपक नगरे यांनी केले. रॅलीत महसूल, पंचायत समिती, कृषी विभाग, नगरपालिका, वन विभाग नाईक महाविद्यालय, पोलीस विभाग यांच्यासह सेवाभावी संस्थांचा सहभाग होता.

    ही रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सावदा रोड, अकोले विद्यालय, चौराहा, चावडी, थडा भाग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोई वाडा, गांधी चौक, आठवडे बाजारमार्गे कमलाबाई गर्ल्स हायस्कुल येथे रॅली आणण्यात येऊन समारोप करण्यात आला.

    शहरातील मतदान केंद्र क्रमांक ९० ते ९५ या केंद्रांवर सर्वात कमी मतदान टक्केवारी असल्याने तेथील केंद्रातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती व्हावी तसेच रावेर शहरातील मतदार यांना मतदान करणे आपला हक्क आहे ही जाणीव करून देण्यासाठी रॅली काढण्याचा उद्देश होता. यावेळी सहा जिल्हा निवडणूक अधिकारी देवयानी यादव यांच्यासह तहसीलदार बंडु कापसे, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, अप्पर तहसीलदार मयूर कळसे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब वाळके, गटशिक्षणाधकारी श्री.दखने, सहा. गटविकास अधिकारी राजेंद्र फेगडे, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, किशोर पवार, यांच्यासह वन अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सर्व ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

    रॅलीत मतदारांनी आपल्या हक्काची जाणीव ठेवावी व सार्वत्रिक निवडणूक हा एक उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले. या भागातील बी.एल.ओ. यांनी मतदारांना मतदानाबाबत जागृत करावे व मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान होईल, याकडे लक्ष द्यावे. जे नवीन मतदार आहेत. नव्याने १८ वर्ष पूर्ण करून प्रथमच मतदान करणार आहे. त्यांनी आपला हक्क बजावावा. रावेर मतदार संघामध्ये सुमारे साडेचार हजार अठरा वर्षांवरील नवीन मतदार यांची नोंदणी केली आहे. संबंधित मतदारांनी जागृत राहून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा व राष्ट्रीय उत्सवांमध्ये सहभाग नोंदवावा, असेही आवाहन देवयानी यादव यांनी केले. प्रास्ताविकासह आभार तहसीलदार बंडु कापसे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.