विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कक्षाधिकारी
साईमत /जळगाव/प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील दोन अधिकारी विद्यापीठ सेवेतून दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले.विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कक्षाधिकारी संगीता पाटील, विद्यापीठातील विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंता सुनील नेमाडे हे नियत वयोमानानूसार विद्यापीठाच्या सेवेतून सेवा निवृत्त झाले आहेत.
सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांना कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप देण्यात आला. सत्कारार्थी यावेळी सहकुटूंब उपस्थित होते.
यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघटना, मागासवर्गीय कर्मचारी संघटना व उमवि पतपेढी व विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
