वनधन बघायला गेले अन्‌ तहसीलदार महसूलधन जप्त करून परतले

0
17
अवैध वाळूने भरलेले दोन ट्रक्टर जप्त; तहसीलदारांची कारवाई-saimat

साईमत, रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पाल येथून अवैध वाळुने भरलेले दोन ट्रॅक्टर सहस्त्रलिंग गावानजिक तहसीलदार बंडू कापसे आणि अप्पर तहसीलदार मयूर कळसे यांनी पकडले. त्यामुळे वाळु माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे तहसीलदार जेव्हाही फिल्डवर जातात. प्रत्येकवेळी कारवाई होते. परंतु नेहमी फिल्डवर राहणारे मंडळ अधिकारी, तलाठींचे मात्र दुर्लक्ष होत असते. दुसरीकडे तहसीलदार बंडू कापसे पाल येथे वनधन बघायला गेले आणि महसूलधन जप्त करून परतल्याने त्याची रावेर परिसरात एकच चर्चा होत आहे.

तहसीलदार बंडू कापसे, अप्पर तहसीलदार मयूर कळसे जंगल सफारीसाठी पाल येथे सकाळी जात असतांना पालकडून अवैध वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टरे येतांना दिसली. ती ट्रॅक्टरे थांबविली असता त्यात अवैध वाळू आढळली. यावेळी दोन्ही ट्रॅक्टरे रावेर तहसील कार्यालय येथे जप्त केली आहे. पालकडून नेहमी अवैध वाळू वाहतूक होत असल्याची ओरड आहे. परंतु याकडे मंडळ अधिकारी, तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here