साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव शहराजवळील गलवाडा(अ) शिवारात गट क्र-१४४ मधून अवैध उत्खनन करतांना दोन ट्रक्टर व एक जे सी बी रंगेहाथ पकडल्याची कारवाई महसूल च्या अवैध गौण खनिज पथकांनी रविवारी केली आहे या कारवाईत दोन्ही ट्रॅक्टर व जे सी बी सोयगाव तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले आहे.या कारवाई मुळे अवैध गौण खनिज वाहतूक दारांची धाबे दणाणले आहे.
सोयगाव महसूलचे भरारी पथकाला गलवाडा(अ) शिवारातील गट क्र-१४४ मध्ये अवैध माती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार रमेश जसवंत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक घटनास्थळी पोहचले असता,त्या ठिकाणी अवैध मातीचे जे सी बी च्या साहाय्याने उत्खनन सुरू असताना पथकांनी रंगेहात पकडून दोन ट्रॅक्टर अनुक्रमे क्र-एम-एच-२० १२०२ व एम एच २०,९२७७ व जे सी बी क्र-एम एच २०,६८७३ ही वाहने रंगेहाथ पकडून सोयगाव तहसिल कार्यकायत जमा केली आहे दरम्यान तहसीलदार रमेश जसवंत यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पाटील,संभाजी बोरसे, शिवाजी शेरे,अनिल पवार पोलीस शिपाई गणेश रोकडे यांच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे सोयगाव तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई महसूलच्या भरारी पथकांनी केली आहे.