अंबरीष ऋषी टेकडीवर दोन मिनिटात दोन हजार २२२ वृक्षांची लागवड

0
40

साईमत/ न्यूज नेटवर्क/अमळनेर :

वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची पाऊले ओळखत समाजात पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘एक रोप आईच्या नावे’ उपक्रमांतर्गत ११ वाजून ११ मिनिटांनी अंबरीष ऋषी टेकडीवर दोन मिनिटात दोन हजार २२२ वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी अमळनेरचे सूपुत्र तथा नागपुरचे आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उप वनसंरक्षक ए.प्रवीण उपस्थित होते.

जिल्ह्याधिकाऱ्यांनी अंबरीष ऋषी टेकडीला संरक्षित वन क्षेत्र जाहीर व्हावे, यासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी वन क्षेत्रासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे ही खूप मोठी उपलब्धी आहे. पुढीलवर्षी तालुक्यातील सर्वच टेकडींवर एकाचवेळी एका मिनिटात असंख्य वृक्षांची लागवड करुन वर्ल्ड रेकॉर्ड करू, असे आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांनी सांगितले.

हा उपक्रम अंबरीष ऋषी टेकडी ग्रुपसह मंगळग्रह सेवा संस्था, महसूल विभाग, वनविभाग, संत सखाराम महाराज संस्थान, महिला हाऊसिंग ट्रस्ट, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी-दुबई, रोटरी क्लब, लायन्स क्लब, अमळनेर महिला मंच ट्रस्ट, फोटोग्राफर संघटना, पत्रकार संघटना, मारवड विकास मंच, ओम शांती परिवार, पतंजली योग समिती आदी सामाजिक संस्थांतर्फे राबविण्यात आला.

यांची होती उपस्थिती

यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी शामकांत देसले, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपील पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्रेहा पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हारचे मुख्य अभियंता विजय भदाणे, कंमांडट सुभेदार मेजर नागराज पाटील, प्रांताधिकारी महादेव खेडकर, मुख्याधिकारी तुषार नेरकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, निवृत्त प्राचार्य डॉ. एस.आर.चौधरी, बजरंगलाल अग्रवाल, डॉ. विक्रांत पाटील, डॉ. अपर्णा मुठे, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहीरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, प्रकाश मेखा, पालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी, बजरंग अग्रवाल, डी.ए. धनगर, उद्योजक विनोद पाटील, धनदाई कॉलेजचे प्रा.के. डी. पाटील, महेश कोठावदे, जळगाव जनता सहकारी बॅँकेचे शाखाधिकारी महेश गर्गे, महेश कोठावदे, जितेंद्र जैन, योगेश मुंदडे, प्रसाद शर्मा, वसुंधरा लांडगे, माधुरी पाटील, करुणा सोनार, अपेक्षा पवार, पराग पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी जळगाव जनता बँक, सौरभ अ‍ॅक्वा यांनी पाण्याचे जार दिले तर काही दात्यांनी गोळ्या बिस्कीट गुप्त दान केले. संजय बाविस्कर यांच्याकडून सर्वांना केळीचे वाटप करण्यात आले. पालिकेच्या सफाई कामगारांनी जागेची साफसफाई केली. सूत्रसंचालन डॉ. डिगंबर महाले तर आशिष चौधरी यांनी आभार मानले.

उपक्रमात यांचा होता सहभाग

उपक्रमात साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, विजय नाना पाटील आर्मी स्कुल, अ‍ॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल, साने गुरुजी कन्या हायस्कुल, सावित्रीबाई फुले कन्या हायस्कुल, जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, लोकमान्य विद्यालय, बोहरा पब्लिक स्कुल, पद्मावती नारायण मुंदडा माध्यमिक विद्यालय, शांती निकेतन विद्यालय, न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल, राजश्री शाहू विद्यालय, गायकवाड हायस्कुल, आश्रमशाळा, लोकमान्य विद्यालय, जी. एस. हायस्कुल, बी. पी. इंग्लिश मीडियम, द्रौ. रा. कन्या शाळा, विवेकानंद इंटरनॅशनल स्कुल, गायकवाड हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, इंदिरा गांधी हायस्कुल, प्रताप कॉलेज, एनसीसी, एनएसएस, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here