Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»लोखंडी प्लेटा चोरणाऱ्या दोघं संशयितांना पूर्ण मुद्देमालासह अटक
    क्राईम

    लोखंडी प्लेटा चोरणाऱ्या दोघं संशयितांना पूर्ण मुद्देमालासह अटक

    SaimatBy SaimatAugust 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव , प्रतिनिधी,

    शहरातील अक्सानगरातून बांधकाम ठेकेदाराच्या मालकीच्या 41 नग लोखंडी प्लेटांची चोरी करणाऱ्या चोरट्यासह एका अल्पवयीन मुलाला एमआयडीसी पोलीसांनी अक्सा नगरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या लोखंडी प्लेटा हस्तगत केल्या आहेत. सोमवारी 7 ऑगस्ट रोजी दोघांना न्यायालयात हजर केले असता अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात रवानगी केली तर दुसऱ्या चोरट्यांला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    अक्सा नगरात शेख अकील शेख कुर्बान हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांधकाम ठेकेदारीचे काम करून आपला व्यवसाय चालवितात. बांधकामासाठी त्यांच्याकडे लोखंडी प्लेटा आहेत. 2 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरासमोर चोरट्याने 41 नग लोखंडी प्लेटा चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा अक्सा नगरात फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली.

    पोलीसांनी रविवारी 6 ऑगस्ट रोजी रात्री कारवाई करत संशयित आरोपी मोबीन खान युसूफ खान मुलतानी याला अटक केली. त्याने चोरी केलेल्या 41 नग लोखंडी प्लेट हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पोहेकॉ अल्ताफ पठाण, गणेश शिरसाळे, पो.ना. विकास सातदिवे, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, पो.कॉ राहूल रगडे, विशाल कोळी यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ तलाठी कार्यालयाचे ४२,५६० रुपयांचे वीज बिल थकीत

    March 14, 2026

    Jalgaon:एमआयडीसीत थकबाकीदारांविरुद्ध जोरदार कारवाई, दोन कंपन्यांना तातडीने सील

    March 14, 2026

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.