Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी
    क्राईम

    भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

    भुसावळ तालुक्यातील फुलगावजवळील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी, ३१ ऑक्टोबर रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, भुसावळ शहरातील आनंद नगरात उमाकांत मुरलीधर परदेशी (वय ३९) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उमाकांत परदेशी हा आपला मित्र भूषण राजेंद्र बिऱ्हाडे यांच्या सोबत दुचाकीने भुसावळ तालुक्यातील फुलगावजवळील राष्ट्रीय महामार्गाने भुसावळला येणासाठी दुचाकीने येत होते. त्यावेळी महामार्गावरील पुलाजवळ समोरून भरधाव वेगाने येणारी कार (क्र.एमएच १४ बीसी ४९६०) ने दोघांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. दोघांना स्थानिक नागरीकांच्या मदतीने तातडीने भुसावळ शहरातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. उपचार घेतल्यानंतर मंगळवारी, ३१ ऑक्टोबर रोजी उमाकांत परदेशी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कारवरील चालक रितेश प्रमोद कोल्हे (रा. दीपनगर, भुसावळ) याच्याविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. मनोहर पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव शहरात घरफोडीची घटना; कोल्हे नगरातून ४० हजारांचा ऐवज लंपास

    March 1, 2026

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.