मालेगावचे दोन सराईत मोटार सायकल चोरटे पकडले

0
25

चोरीस गेलेल्या एक लाख ३५ हजाराच्या दोन मोटार सायकली जप्त

साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी।

शहरातील घाट रोड, छाजेड ऑईल मिल परिसरातून गेल्या १३ सप्टेंबर २०२४ रोजी मोटार सायकल चोरीला गेली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मोटार सायकल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील दोन सराईत भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकल जप्त केल्या आहेत.

सविस्तर असे की, फिर्यादी मुबशीर खान मेहमुद खान (वय-२७, रा. घाट रोड, छाजेड ऑईल मिल परिसर, चाळीसगाव) यांनी २० सप्टेंबर रोजी त्यांच्या मालकीची ६५ हजार रुपये किंमतीची सुझुकी कंपनीची बरमॅन स्टीट मॉडेलची मॅट काळया रंगाची मोटार सायकल (क्र. एमएच-१९ ईसी-०५८२) ही १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान चाळीसगाव शहरातील घाट रोड, छाजेड ऑईल मिल परिसरातून त्यांच्या राहत्या घरासमोरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकलीचा व अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांचे पथक स्थापन करुन त्यांना योग्य त्या सूचना देवून रवाना केले होते. पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील घटनास्थळी जावून परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून मिळालेल्या फुटेजच्या आधारे व गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी उमर फारुख कलीम अहमद (वय २०, रा. गाँसे आझम नगर, मालेगाव, जि. नाशिक), मोहम्मद शोएब मोहम्मद ईलियास (वय २३, रा. सर्व्हे नं. ६२, प्लॉट नं. १९ गौसे आझम नगर, मालेगाव, जि. नाशिक)यांना ताब्यात घेवून त्यांची सखोल विचारपुस केली. तेव्हा त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देवून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल व चोरी करतांना वापरलेली ७० हजार रुपये किंमतीची होन्डा HORNET कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल असा एक लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकल जप्त केल्या आहेत. आरोपींच्या ताब्यात मिळुन आलेली होन्डा HORNET कंपनीची काळ्या रंगाची मोटर सायकल ही शांतीनगर पो. स्टे. ठाणे शहर येथील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार), सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. राहुल सोनवणे, पो.ना. भूषण पाटील, महेंद्र पाटील, पो.कॉ. विजय पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, पवन पाटील, राकेश महाजन, नरेंद्र चौधरी यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पो.हे.काॅ. राहुल सोनवणे, पो.काॅ. ज्ञानेश्वर पाटोळे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here