कार आणि ट्रेलरच्या अपघातात दोघे जखमी
वरणगाव-भुसावळ तालुक्यातील वरणगाव-बोहर्डी गावादरम्यानच्या पेट्रोल पंपाजवळ कार आणि ट्रेलच्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, राजेंद्र नथमल कोचर वय ६९ रा. भगवान महावीर मार्ग, मलकापूर जि.बुलढाणा हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शाम पुंडलीक खैरे यांच्यासोबत कार क्र.(एम.एच.२८आर. ३६३७) ने मालेगाव येथे जात असतांना वरणगाव-बोहर्डी गावाच्या दरम्यान पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. या धडकेत राजेंद्र नथमल कोचर आणि त्यांच्या सोबतचे सुगमचंद उत्तमचंद आगड (दोन्ही रा. मलकापूर) हे जखमी झाले.
जखमींना तातडीने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी राजेंद्र कोचर यांनी दिलेल्या फिर्यादीरून कार चालक शाम खैरे आणि ट्रेलर वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ यासीन पिंजारी हे करीत आहे.