साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी विभागातर्फे तसेच नॅशनल सायबर सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया अॅन्ड सायबर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१० व ११ जानेवारी रोजी ““सायबर सिक्युरिटी समिट” या दोन दिवसीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर शिखर परिषदेचा मुख्य विषय “सायबर सिक्युरिटी” हा असून या मुख्य विषयावर परिषदेत विचार मंथन होणार आहे.
या परिषदेतील पहिल्या उद्घाटकीय सत्रात व बीजभाषक म्हणून माजी एडीजी प्रसार भारती व संचालक आयएएफ तसेच आयएसएसीचे संचालक जीपी कॅप्टन पी. ए. नायडू हे “सायबर सुरक्षा आव्हाने आणि संधी” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परिषदेच्या दुसऱ्या सत्रात “सायबर सुरक्षा भविष्यात नेव्हिगेट करणे” या विषयावर हैदराबाद येथील सायबर सुरक्षाचे प्रख्यात सल्लागार आशुतोष म्हैसेकर हे मार्गदर्शन करतील तर यानंतर ट्रेस इन्फोसोल प्रा.लि.चे संस्थापक मयुरेश भागवत हे डिजिटल पेमेंट सुरक्षा आणि क्रिप्टोकरन्सी यावर तर जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील या “प्रतिमा आणि व्हिडिओ बनावटीचे कायदेशीर परिणाम” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेतील दुसऱ्या दिवशी डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी पुणे येथील डॉ अरुण मिश्रा हे ट्रस्टेड कॉम्प्युटिंग या विषयावर तर प्रतिष्ठित पत्रकार शेखर पाटील हे एआय आणि पत्रकारिता: खोट्या बातम्यांविरुद्ध धोका आणि लढाई यावर तसेच जळगाव सायबर सेलचे दिगंबर थोरात व दिलीप चिंचोळे हे सायबर सुरक्षावर मार्गदर्शन करतील.
यावेळी विविध राज्यामधून अनेक प्राध्यापक व विद्यार्थी या परिषदेस उपस्थित राहणार असून सायबर सिक्युरिटी समोरील वर्तमान आव्हाने आणि प्रश्नांच्या संदर्भात या परिषदेत विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक व या विषयात कुतूहल असणाऱ्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान या शिखर परिषदेचे संयोजक व रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी केले आहे.