Two bribe-taking police officers : भुसावळात दोन लाचखोर पोलिसांना अटक

0
15

वॉरंट रद्द करण्यासाठी मागितली लाच

साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : 

अटक वॉरंट प्रकरणी एका आरोपीला अटक न करता वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई भुसावळ परिसरात करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहिती हाती आली त्यावेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, एका तक्रारदाराला गुन्हेगारी प्रकरणी अटक वॉरंट आले होते. हे वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ देण्यासाठी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने यासंदर्भात जळगाव येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

एसीबीचा सापळा यशस्वी

एसीबीच्या पथकाने सापळा रचून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, तेच अशा प्रकारच्या गैरकृत्यांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here