Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार दोन चोरट्यांना अटक
    क्राईम

    घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार दोन चोरट्यांना अटक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 8, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ७८ हजारांचा ऐवज जप्त, रावेर पोलिसांची कारवाई

    साईमत/जळगाव/रावेर/प्रतिनिधी :

    रावेर शहरात घरफोडी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना रावेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी करण्याचे साहित्य, सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ७८ हजार ३६० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांवर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने रविवारी, ८ सप्टेंबर रोजी दिली आहे.

    सविस्तर असे की, रावेर शहरातील श्रीकृष्ण नगरात प्रवीण सिताराम महाजन (वय ३४) यांचे बंद घर फोडून शुक्रवारी, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना घरफोडी करणारे चोरटे हे रावेर व सावदा रस्त्यावरून जात असल्याची गोपनिय माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने शनिवारी, ७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता गैबन शहा बाबांच्या दर्ग्याच्या टेकडीखाली सापळा रचून गोलूसिंग नशीबसिंग पटवा (वय २०, रा.बडवणी जिल्हा) आणि सुनीलसिंग केवलसिंग बरनाल (वय २६, रा.धार, जि.मध्यप्रदेश) यांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी घरफोडीची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चोरी करण्याचे साहित्य, चोरी करण्याचे साहित्य, चांदीचे पैंजण असा ७८ हजार ३६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    यांनी केली कारवाई

    ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील, घनश्याम तांबे, हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, सचिन घुगे, सुकेश तडवी, विकारोद्दिन शेख, अमोल जाधव, विशाल पाटील, महेश मोगरे, प्रमोद पाटील यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.