साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील आर्मी स्कूल ज्युनियर कॉलेजमधील बारावीचा विद्यार्थी तुषार विजय राठोड याने १९ वर्षे आतील गटात जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड केली आहे. याबद्दल क्रीडा शिक्षक विजय बोरसे आणि विजेता खेळाडू तुषार राठोड या दोघांचे संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, संस्थेचे मानस सचिव सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील, श्याम पवार, प्राचार्य पी.एम. कोळी, सुभेदार मेजर नागराज पाटील, बटू पाटील, श्रीराम पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.