साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ‘क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत’ मोहीम राबविली जात आहे. मोहिमेत जिल्ह्यातील ५२ गावे समाविष्ट केली आहेत. त्यात मुक्ताईनगरमधील वायला आणि माळेगाव अशा दोन ग्रामपंचायतींची निवड केली आहे.
‘क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत’ उपक्रमाचा एक भाग म्हणून माळेगाव येथे ग्रामपंचायत पदाधिकारी, सर्व ग्रामस्थांची एक सभा घेण्यात आली आहे. सभेत आरोग्य विस्तार अधिकारी शिवदास राठोड यांनी मोहिमेचा अजेंडा समजून नागरिकांना सांगितला. क्षयरोग विभागाचे तालुका पर्यवेक्षक दिनेश सूर्यवंशी यांनी क्षयरोग आजाराची लक्षणे, उपचार पद्धती व नागरिकांच्या क्षयरोग प्रसार रोखता यावा, यासाठीच्या नैतिक जबाबदारी व कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. ही मोहीम राज्यस्तरीय मार्गदर्शक सूचनानुसार डॉ.विवेकानंद बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर येथे राबविण्यात आली.