सहकारात संस्थेचा विश्वास, कर्जदाराचा प्रामाणिकपणा महत्त्वाचे

0
8

स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अजय ब्रम्हेचा यांचे प्रतिपादन

साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

सहकारात संस्थेचा विश्वास, कर्जदाराचा प्रामाणिकपणा हे महत्त्वाचे आहे, असे मत व्याख्याते अध्यक्ष दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन मुंबई, संचालक नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन, अध्यक्ष लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लासलगाव अजय ब्रम्हेचा यांनी मांडले. ते दि चोपडा पीपल को ऑप बँक लि.च्यावतीने, बँकिंग क्षेत्रातील सहकाऱ्यांचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम १२ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकाराची वाटचाल’ विषयावर बोलताना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. प्रमुख पाहुणे संचालक दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन मुंबई, अध्यक्ष जनकल्याण को-ऑप बँक लि. नाशिक नानासाहेब सोनवणे, संचालक दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन मुंबई, अध्यक्ष ओझर मर्चंटस को-ऑप. बँक लि. ओझर रत्नाकर कदम, संचालक जळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशन अध्यक्ष जळगाव जनता सहकारी बँक लि. सतीश मदाने, निमंत्रित सदस्य जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन संजय बिर्ला, संचालक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव उद्योगपती घन:शाम अग्रवाल व बँकेचे विद्यमान संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते. स्वागत गीत स्वाती पाटील यांनी गायले तर प्रमुख उपस्थितांचे स्वागत चेअरमन चंद्रहास गुजराथी व संचालकांनी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

ते पुढे म्हणाले की, उदयास आलेल्या सहकारी संस्था लयास का जातात व सहकार चालविताना येणाऱ्या अडचणी, यावर विवेचन करताना, सहकारात पद घेऊन ती मिरविण्यापेक्षा संस्थेकडे लक्ष देणे तिची प्रगती करणं विकास करणे रोजगार देणे गरजेचे असत. त्याप्रमाणे विशेषतः ग्रामीण भागात चुकीचे व्यवस्थापन, चुकीचे व्यवहार, चुकीचे निर्णय आणि सरकारचा राजकीय हस्तक्षेपामुळे संस्था चालविणे कठीण होऊन बसत.

सहकारातील अडचणी शंकाचे समर्पक दिली उत्तरे

प्रामुख्याने व्यवस्थापन व कर्मचारी शिक्षित भेटत नसल्याने त्यासाठी, कुशल कर्मचारी भेटणे आवश्यक आहे. त्यांचे प्रशिक्षणही गरजेचे असते. अशा सर्व बाबींचा अभ्यास केंद्रीय स्तरावरील नव्याने निर्माण झालेले सहकार खातं हे तज्ञाच अभ्यास मंडळाच्या सहकार्याने कालबाह्य १९६० चा कायद्यात नव्याने सुधारणा करून २०२४ ला नवीन कायदा आणू शकते. यावेळी ज्यांनी सहकारातील अडचणी शंकाचे समर्पक उत्तरे दिली. यावेळी सहकार क्षेत्रातील तज्ञांनीही आपली अभ्यापूर्ण मते मांडली. प्रास्ताविक चेअरमन चंद्रहास गुजराथी तर सूत्रसंचालन गोविंद गुजराथी, आभार किशोर गुजराथी यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here