Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»आकाशवाणी चौकात ट्रकची दुचाकीला धडक
    जळगाव

    आकाशवाणी चौकात ट्रकची दुचाकीला धडक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 2, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अपघातात तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा; तरुणही गंभीर जखमी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    शहरातील आकाशवाणी चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना महाराष्ट्र दिनी गुरुवारी, १ मे रोजी रात्री आठ वाजता घडली होती. दरम्यान, दोन्ही जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

    शहरातील आकाशवाणी चौकात ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या दोन जणांमध्ये नयन मिलिंद तायडे (वय २२, रा.महाबळ) आणि रोहित संजय माळी (वय २१, रा. राधाकृष्ण नगर, जळगाव) यांचा समावेश आहे.

    जळगाव शहरातील आकाशवाणी चौकाकडून नयन तायडे आणि रोहित माळी हे दोन्ही तरुण-तरुणी दुचाकीने आकाशवाणी चौकाकडून उड्डाणपुलाकडे वळण घेत असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी रस्त्यावर पडल्याने तिच्या पायावरुन ट्रकचे दोन्ही चाक गेल्याने तिच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला तर रोहित हा गंभीर जखमी झाला आहे.

    दरम्यान, ही घटना घडल्यानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेऊन त्यांना तातडीने उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यासंदर्भात पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत कुठलेही नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.