सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धत पोदार स्कूलला तिहेरी मुकुट

0
67
oplus_0

साईमत न्यूज नेटवर्क जळगाव

येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मनपा स्तरीय आंतरशालेय सुब्रोतो चषक फुटबॉल स्पर्धा चे आयोजन जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन च्या माध्यमातून करण्यात आले होते. या स्पर्धेचा समारोप शनिवारी संध्याकाळी झाला. स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात अंतिम विजेतेपद मुलींमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूलने तर उपविजेतेपद रायसोनी इंग्लिश मीडियम ने पटकाविले. मुलांमध्ये पोदार विजयी तर ओरियन सीबीएससी पोदार हा उपविजेता ठरला. तत्पूर्वी १५ वयोगटात सुद्धा पोदार विजयी ठरल्याने तिन्ही गटात पोदार विजयी ठरत तिहेरी मुकुट प्राप्त केला.

विजेते उपविजेते संघांना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाऊस तर्फे सुवर्ण व रजत पदक प्रमुख अतिथींच्या हस्ते देण्यात आले.
पारितोषिक समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंधार पंडित, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान, सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता ताठे, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख, कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे, अब्दुल मोहसीन, ॲड. आमीर शेख, अन्वर खान, मतीन पटेल, फारूक काद्री आदींची उपस्थिती होती.
स्पर्धेची समारोपीय प्रस्तावना फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी सादर केली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओरिएन स्टेट ची खेळाडू श्रद्धा पाटील व आभार प्राध्यापक डॉ. अनिता कोल्हे यांनी मानले.
स्पर्धेतील पंचाचे गौरव
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मॅच कमिशनर अब्दुल मोहसीन, स्पर्धा प्रमुख पंच वसीम शेख व राहील शेख, यांच्यासह हिमाली बोरोले, रोहिणी सोनवणे, इम्रान बिस्मिल्ला, सादिक अली, अझान पटेल, अनस शेख,आदिल शाह, मतीन शाह, सैफ शेख, धनंजय धनगर, दीपक सस्ते, रेहान शेख, सुफियान तेली, शेखर तडवी, आदींचा प्रमुख अतिथी च्या हस्ते गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here