कार्याचा, आठवणींचा अन् व्यक्तिमत्त्वातील पैलूंचा मिळाला उजाळा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील बळीराम पेठेतील स्वामी चिदानंद सभागृहात ज्येष्ठ पत्रकार, करुणा त्रिपदी परिवारात निस्वार्थी सेवा देणारे हेमंत काळुंखे यांना त्रिपदी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम रविवारी, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडला. याप्रसंगी त्यांच्या कार्याचा, आठवणींचा आणि व्यक्तिमत्त्वातील पैलूंचा उजाळा उपस्थितांनी मनोगतातून देऊन आदराजंली वाहिली. राजेंद्र कुळकर्णी यांनी त्यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीबद्दल भावना व्यक्त केल्या. अनिल तारे यांनी त्यांच्या निस्वार्थी सेवेला उजाळा देत, त्रिपदी परिवार कधीही त्यांना विसरू शकणार नसल्याचे सांगितले. बाबासाहेब यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
धर्मसाथी आणि गुरुदत्त भक्ती प्रसाद धाम, नवीपेठ परिवारातर्फे प्रसाद जोशी यांनी पत्रकारिता क्षेत्रातील सहवासातील आठवणी सांगत श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाला काळुंखे यांचे चिरंजीव हेमरत्न, पुतणे योगेंद्र , धीरज काळुंखे यांच्यासह भुसावळ त्रिपदी परिवाराचे सुधीर देशपांडे, अजय जोशी, किशोर जोशी, सदिस्तभ, जळगाव परिवाराचे प्रदीप सोनवणे, किशोर सोनवणे, बापू नेवे, बाबा नेवे, विलास नेवे आदी सदस्य उपस्थित होते. शेवटी शांती मंत्राने श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता झाली.