कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे सादर करून आणली रंगत
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
प्रबोधन नगरातील मातोश्री प्राथमिक विद्यालयात प्रबोधन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला मुख्याध्यापक समाधान इंगळे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. तसेच त्यांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. त्यानंतर समाधान ठाकरे यांनीही फुले दांपत्यांच्या समाजकारण, शिक्षणप्रबोधन आणि स्त्रीशिक्षणातील योगदानाबद्दल प्रभावी भाषण केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्यावरील विचार, भाषणे सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दुसरीची प्रार्थना धांडे, रुचिका सपकाळे, तिसरीची प्रियंका सोळुंके, सेजल शिरसाळे, चवथीची प्रांजल सोनवणे, पाचवीची आरती पवार, समर शिरसाळे, सना तडवी, सहावीची दर्शना सपकाळे, ज्ञानेश्वरी देवराज, मयूर ठाकरे, देविका बाविस्कर, पूजा देवराज, सातवीची तेजश्री बाविस्कर, आदिती वानखेडे, अनुजा कोळी यांचा समावेश होता. सर्व विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या शिक्षणविचारांचे उत्तम दर्शन घडविले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन शारदा मोहिते यांनी पार पाडले. सूत्रसंचालन पाचवीचा विद्यार्थी लाजर बाविस्कर याने केले.
