साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा करण्यास सुरवात झाली आहे. आदिवासी ठाकूरांच्या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे ठाकूर जमातीतील महिला मंडळ पुढाकार घेऊन होळीची तयारी करतात. येथील श्रीराम कॉलनीतील संत सखाराम महाराजांच्या शेतात पारंपरिक पद्धतीने ठाकूर समाजातर्फे होळी साजरी करण्यात आली.
उंबरच्या झाडाची फांदी उभी करून खोल खड्यातील पायाशी गवरी ठेवून सामूहिक वर्गणीतून गोळा केलेली कोरडी लाकडं, गवऱ्या रचून होळी उभी केली होती. होळीस सजावट साहित्य, होळीला रंगबिरंगी पताका, फुगे लावून महिलांनी होळी सजविली होती. महिला प्रमुख मिना ठाकूर, सचिव शैलजा शिंदे, कोषाध्यक्ष अपेक्षा पवार, उपाध्यक्ष रेखा ठाकूर, सल्लागार जयश्री वाघ, हिराबाई ठाकूर, हर्षदा वाघ, आशा ठाकूर, भारती ठाकूर, संगीता ठाकूर, स्वाती ठाकूर, प्रियंका ठाकूर, हर्षदा ठाकूर , मनीषा ठाकूर, मंगल ठाकूर, यमुना ठाकूर, संगीता ठाकूर, रुपाली ठाकूर, दीपाली ठाकूर, कोकीला ठाकूर, गायत्री ठाकूर, सरला ठाकूर यांच्यासह उपस्थित महिलांनी होळीची विधीवत पूजा करून खण, नारळाची ओटी वाहून होळीला अग्नी दिला.
याप्रसंगी जमातीचे प्रमुख दिलीप ठाकूर, राज्याचे सरचिटणीस कार्यकर्ते रणजित शिंदे, गुणवंत वाघ, जितेंद्र ठाकूर, संजय ठाकूर, डॉ. कौस्तुभ वानखेडे, अनिल ठाकूर, मच्छिंद्र बागुल, धनराज ठाकूर, रवींद्र वानखेडे, प्रकाश वानखेडे आदींनी होळीला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. ‘होळी रे होळी’ च्या गजरात होळीला नवैद्य अर्पण करीत पूजन केले.
यावेळी विजय ठाकूर, गजानन ठाकूर, उमाकांत ठाकूर, राजेंद्र ठाकूर, ज्ञानेश्वर ठाकूर, सुरेश ठाकूर, सतिश ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते लिलाधर ठाकूर, रामदास ठाकूर, भैय्या ठाकूर, यशवंत सूर्यवंशी, युवा कार्यकर्ते दीपक ठाकूर, वैभव ठाकूर, दीपक वानखेडे, विवेक सूर्यवंशी, गणेश ठाकूर, मुकेश ठाकुर यांच्यासह समाज बांधवांनी होळीच्या अग्नीभोवती उत्साही वातावरणात फेर धरला.
आदिवासी ठाकुरांमध्ये पाच दिवसीय होळीचा शिमगा उत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न ठाकूरांच्या सामूहिक होळीतून अमळनेरात होत असतो. होळीचा प्रसाद म्हणून उपस्थितांना गुळाची जिलेबी वाटप करण्यात आली.