साईमत, मुंबई ः प्रतिनिधी
राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाचा मोठा उत्साह दिसून आला. मुंबई, ठाणे आणि पुण्यात दहीहंडीचा मोठा जल्लोष असतो. राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची वर्दळ येथील दहीहंडी सोहळ्यात दिसून येते. राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे ठाण्याचे रहिवाशी असल्याने दहीहंडी उत्सावाला त्यांनी ठाण्यासह, मुंबई आणि विविध ठिकाणी उपस्थिती लावत गोविंदा आणि कार्यकर्त्यांसोबत दहीहंडी उत्सवात उत्साह भरला.
दहीहंडी उत्सवात ४० गोविंदा जखमी
मुंबईत विविध भागात ४० वर गोविंदा जखमी झाले आहेत. ठाणे शहरात गुरुवारी १३ गोविंदा जखमी झाले आहेत. यामध्ये ९ गोंविदांना कळवा रुग्णालयात तर चार गोविंदांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.. यामध्ये एका महिला गोंविदाचा समावेश असून त्या महिला गोविंदाच्या मणक्याला दुखापत झाल्याने, नातेवाईकांनी तातडीने मुंबईच्या खासगी रुग्णालयात हलविले आहे. तर एक गोविंदाचा हात फॅक्चर झाला असून उर्वरित सर्व जण किरकोळ जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईतील संस्कृती दहीहंडीत जय जवानाचा मनोरा ९ व्या थरावरून कोसळला.