Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon District Central Jail : जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची घेतली झाडाझडती मोहीम
    क्राईम

    Jalgaon District Central Jail : जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची घेतली झाडाझडती मोहीम

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 5, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची झाडाझडती घेण्यात आली. कारण कारागृहात बंदिस्त असलेल्या आरोपींकडून काही आक्षेपार्ह वस्तू सापडतात का? यासाठी ही झाडाझडती मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने विविध शाखांच्या मदतीने करण्यात आली. मात्र, तपासणीत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नसल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली.

    झाडाझडती मोहिमेत डॉग स्कॉड, क्यूआरटी, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), जिल्हा पेठ पोलीस ठाणे तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनमधील कर्मचारी सहभागी झाले होते. ही संपूर्ण कारवाई नुकतेच एलसीबीचे पदभार स्वीकारलेले संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

    कारागृहाची बारकाईने केली तपासणी

    जळगावमधील मध्यवर्ती कारागृह जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आहे.सध्या तेथे क्षमतेपेक्षा अधिक आरोपी आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी कोणताही गैरप्रकार किंवा आक्षेपार्ह गोष्टी घडू नयेत, म्हणून ही झाडाझडती राबविण्यात आली. संपूर्ण कारागृहाची बारकाईने तपासणी केली. तपासणीत कोणतीही प्रतिबंधित किंवा संशयास्पद वस्तू सापडली नसली तरी अशा कारवाईमुळे कारागृहात चांगलीच धडकी भरली आहे. पुढील काळात अशा घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.