डॉ.अस्मा मुजावर यांची बदली पाच तालुके सोडून कुठेही करा

0
22

साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर

सिंदखेडराजा तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून डॉ. अस्मा मुजावर ह्या रुजू झाल्या आहेत. पुन्हा रुजू झाल्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांची बदली सिंदखेडराजा तालुका, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा व बुलढाणा असे तालुके सोडून इतर कुठेही करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते बबन सरकटे व इतर जणांनी सिंदखेडराजा उपविभागीय अधिकाऱ्यांंना दिले नुकतेच दिले आहे.

चार वर्ष डॉ. अस्मा मुजावर सिंदखेडराजा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर अगोदर कार्यरत होत्या. त्यांनी अनेक चांगली कामे केली. अवैध वाळू वाहतुकीला लगाम घातला. याबद्दल शंका नाही. परंतु सिंदखेडराजा तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकदारांशी तसेच एजंट यांच्याशी त्यांची ओळख असल्यामुळे तसेच शेतीचे प्रकरण व इतर प्रकरणांमध्ये त्यांनी अगोदरच काम केले आहे. त्यामुळे त्या पुन्हा रुजू झाल्यामुळे यापूर्वीचे संबंध लक्षात घेता एजंट यांचे मनोबल वाढले आहे. शेतीच्या प्रकरणात व इतर कामांमध्ये न्याय सर्वसामान्य नागरिकांना मिळणार नाही.

तालुक्यातील कामांना खिळ बसण्याची शक्यता

चार वर्षे त्यांना तालुक्याचा चांगला अभ्यास आहे. अनेक कामांची माहिती सुद्धा आहे. त्यामुळे त्यांचे पूर्वीचे असलेले संबंध लक्षात घेता तालुक्यातील कामांना खिळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांची बदली होईल तेवढ्या तातडीने करण्याची मागणी सरकटे यांनी केली आहे. डॉ. अस्मा मुजावर यांची बदली मंत्रालयातून करून आणली आहे. आपण ह्या सर्व गोष्टी प्रशासनाच्या लक्षात आणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचे सरकटे यांनी सांगितले. निवेदनावर बबन सरकटे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here