चोपड्यातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी पालक मेळावा उत्साहात

0
11

विविध मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचे आवाहन

साईमत/चोपडा/प्रतिनिधी

येथील शिक्षण मंडळ संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी पालक मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेच्यासचिव माधुरी मयूर, प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. जयेश गुजराथी, आयक्यूएसी समितीचे सभासद गोविंद गुजराथी, डी.टी.महाजन, प्रा.एम. पी.पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे आदी उपस्थित होते.

मेळाव्यात द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी मनीषा आणि त्यांच्या समूहाने ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालय नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे.

त्या दृष्टिकोनातून पालक व विद्यार्थ्यांना गुणवत्ता विषयक मार्गदर्शन डॉ. जयेश गुजराथी यांनी केले. गुणवत्ता व्यवस्थापनात विद्यार्थी व पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे याविषयी अनेक उदाहरणे देऊन पालकांना माहिती दिली. पालकांचा दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याने या उद्देशाने पालकांची मते विचारात घेण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या सचिव मधूरी मयूर यांनी फक्त कागदोपत्री गुणवत्ता महत्त्वाची नाही. विद्यार्थ्यांमध्ये खऱ्या अर्थाने गुणवत्ता रुजविणे महत्त्वाचे आहे. हेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी भावी काळात शिक्षक म्हणून विविध शाळांमध्ये कार्यरत होणार आहेत. विद्यार्थी घडविण्याचे कार्य करणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असणे गरजेचे आहे. विविध मूल्यांचे संस्कार आजच्या काळात महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.

यशस्वीतेसाठी आयक्यूएसी कमिटी सदस्य व मुख्य लिपिक शरद पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार प्रा. डॉ. सविता जाधव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here