अवैध वाळू वाहतुकीचे डबल दंडास पात्र असलेले ट्रॅक्टर महसुलच्या ताब्यात

0
30

ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी राजकीय दबाव प्रभावाचा प्रयत्न

साईमत/यावल/प्रतिनिधी :

शहरात खुलेआम अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोमवारी, २३ सप्टेंबर रोजी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यासह महसूल पथकाने पकडल्याने राजकारणात, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. कारवाई होऊ नये म्हणून राजकीय दबाव आणि प्रभाव आणून ट्रॅक्टर सोडवू टाकू, असेही दबक्या आवाजात चर्चिले जात आहे.

यावल शहरात साई ॲक्वा पाणी लघु उद्योग फॉर्मजवळ २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दीड ब्रास अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडून यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले. ट्रॅक्टरवर काही कारणांनी डबल दंडाची कारवाई होणार असल्याचे शहरात चर्चिले जात आहे.

वाहन यावल तहसील कार्यालयात केले जमा

तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरात गणेश नथु महाजन यांच्या मालकीचे स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर वाळू अवैध वाहतूक करतांना पकडण्यात आले. बोरखेडा खुर्दचे तलाठी शरीफ तडवी, हिंगोणाचे तलाठी संदीप गोसावी, दहिगावचे तलाठी मिलिंद कुरकुरे, टाकरखेडाचे तलाठी उमेश बाभुळकर, कोतवाल सोनूसिंग राजपूत, बॅकअप टिममध्ये साकळीचे मंडळ अधिकारी सचिन जगताप, कोतवाल गणेश महाजन, यावलचे कोतवाल निलेश गायकवाड, वाहन चालक अरविंद बोरसे यांनी वाहन यावल तहसील कार्यालय येथे जमा केले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here