Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»ट्रॅक्टर विहिरीत कोसळले ; ८ मजूर महिला दगावल्या
    क्राईम

    ट्रॅक्टर विहिरीत कोसळले ; ८ मजूर महिला दगावल्या

    Vikas PatilBy Vikas PatilApril 4, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ट्रॅक्टर विहिरीत कोसळले ; ८ मजूर महिला दगावल्या

    नांदेड (प्रतिनिधी)-

    नांदेड शहरानजीक आलेगाव शिवारात शेजमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने ८ मजूर महिला दगावल्याचे सांगितले जात आहे. हिंगोली -नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला. अपघातानंतर ३ महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ८ जणींचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातील महिला मजूर आलेगाव शिवारात हळद काढायला आल्या होत्या. ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला.

    पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सकाळी ७ वाजेदरम्यान ही घटना घडली. सध्या बचावकार्य सुरु आहे. ३ महिलांसह एका पुरुषाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

    या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला ट्रॅक्टरचे केवळ टायर दिसत आहे. ट्रॅक्टरमध्ये नेमके किती जण होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

    पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने इतर सर्वजणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करत आहेत. प्रशासकीय यंत्रणा देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. मजुरी करण्यासाठी आलेल्या महिलांचा असा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.