साईमत जळगाव प्रतिनिधी
महानगरपालिकेत मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करावयाचे असल्याने सर्वेक्षणाचे काम सुरु करावयाचे अनुषंगाने दि.२१ जानेवारी रोजी सकाळी १०.०० ते ०१.०० तसेच दुपारी ०२.०० ते ०५.०० या प्रमाणे प्रत्येकी दोन सत्रात महानगरपालिका सभागृह, धांडे सभागृह, जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व सेमिनार हॉल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अशा तीन ठिकाणी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.
प्रशिक्षण कामी ४२ पर्यवेक्षक ५८५ प्रगणक असे एकुण ६२७ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यापैकी ४७४ इतक्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले व १५३ कर्मचारी प्रशिक्षणास अनुपस्थित होते.
सदरील प्रशिक्षण वर्ग मास्टर ट्रेनर, सहा. आयुक्त अभिजित बाविस्कर, सहा. आयुक्त अश्विनी गायकवाड, सुभाष मराठे, सागर राजेंद्र सेजवळ (पुणेकर), सह. आयुक्त गणेश चाटे, समिर बोरोले यांनी उपस्थित राहुन प्रशिक्षण दिले. तसेच आयुक्त विद्या गायकवाड, अति. आयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी प्रशिक्षण केंद्रास भेट दिली.
