सामूहिक गोसेवा, पूजन, गोग्रास, सवामणी लापसी दानाचा कार्यक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गेल्या १० वर्षांपासून निरंतर पितृपक्षाचे औचित्य साधून पितरांना मोक्षप्राप्ती, धर्मजागृती, विश्वकल्याण, गोसरंक्षण हेतू संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित सामूहिक गोसेवा, पूजन, गोग्रास, सवामणी लापसी दान कार्यक्रम सालाबादप्रमाणे यंदाही नेरीनाका लगतच्या पांझरा पोळ गोशाळेत रविवारी, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आयोजित केला आहे.
कार्यक्रमास सोनार समाज वंशावळकार ललित महाराज अहिरराव उपस्थित राहणार आहेत. तसेच समाजातील इतर संस्था, मंडळे प्रतिनिधी यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याच्या गौरव प्रित्यर्थ त्यांचा सन्मान व सत्कार होईल. श्राद्धपक्ष असल्याने कार्यक्रमाला सर्व धर्मप्रेमी, गोसेवक, समाजबांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.