Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»संपादकीय»‘ ते ’ चार दिवस
    संपादकीय

    ‘ ते ’ चार दिवस

    SaimatBy SaimatJanuary 8, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

       कोमल पाटील

    मासिक पाळी म्हणजे चारचौघात न बोलण्याचा विषय. त्यामुळे पाळी विषयी खुले आम चर्चाच होत नाही. या प्रक्रियेबद्दल वापरात येणारे आरोग्यदायी शब्दही मोकळेपणाने वापरले जात नाही. अडचण आहे. बाजूला बसली आहे, कावळा शिवला पासारखे शब्द वापरून या प्रक्रियेचे हेटाळणी केली जाते आजही समाजामध्ये ह्या गोष्टीबद्दल मोकळेपणाने बोलले जात नाही. ऐवढेच काय तर दुकानात किंवा केमिस्टकडे सॅनिटरी नॅपकीन सुध्दा दबक्या आवाजात, आजूबाजूला कोणी ऐकत तर नाही ना, याची खात्री करूनच मग मागितला जातो आणि दुकानदारही तो सॅनिटरी नॅपकीन अगदी कागदात गुंडाळून देतो कशाला हवी एवढी लपवाछपवी या क्रियेमुळे स्त्रीला मातृत्व लाभले. त्याच काळात तिला अशी वागणूक का द्यावी? परमेश्वराने हे जग निर्माण केले म्हणता, मग त्याच जगाचा इतका महत्त्वाचा भाग अस्पृश्य कसा ठरेल ? मासिक पाळी हा पून निर्मितीचा महत्वाचा टप्पा तर आहेच पण स्त्रीत्व आणि मातृत्व या दोघांचा समन्वय साधणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र ह्याच नैसर्गिक प्रक्रियेत स्वतःला उच्चशिक्षीत म्हणवून घेणाऱ्या स्त्रिया देखील आपला जीव एक प्रकारच्या धोक्यात घालताना देखील दिसतात, हे आपले दुर्देवच म्हणावे लागेल. कारण अगदी उच्चशिक्षीत महिलाही आपण पाहिले तर सण, समारंभ किंवा घरातील काही शुभकार्य • असेल तर त्या टाईमटेबलनुसार शरिराचेही टाईमटेबत अॅडजेस्ट करू पाहतात म्हणजे त्या शुभकार्यात त्यांना सहभागी होता यावे म्हणून पाळी पुढे ढकलण्याच्या किंवा लवकर येण्याच्या गोळ्या घेताना आपल्याला त्या दिसून येतात. त्या एक किंवा दोन दिवसाच्या समारंभासाठी एकप्रकारे आपले आयुष्यच धोक्यात घालतात आणि हे त्या गोळ्या बनविणान्या कंपनीच्या सुदैवाने आणि गोळ्यांचा वापर करणाऱ्या स्त्रीयांच्या दुर्देवाने त्यांच्या कधी लक्षातच येत नाही. ह्या गोष्टींमुळे होणारा त्रास हा त्या स्त्रीलाच भोगावा लागणार आहे हेही तिच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या

    गोळ्यांवरच बंदी घालणे गरजेचे आहे. आज आपण पाहिले तर, ग्रामीण भागातल्या या स्त्रीया आहेत, त्या आजही ह्या चार दिवसात कापडांचा वापर करताना दिसतात. एकच कापड धूवून पुन्हापुन्हा वापरले जाते आणि मग ते कापड कुठेतरी अंधारात किंवा भिंतीच्या आड दडवून ठेवले जाते. आणि तेच पुन्हा त्या चार दिवसांमध्ये वापरले जाते. त्यातून महिलांना जंतुसंसर्ग होतो. अखेर हे सर्व टाळण्यासाठी महिलांनी सॅनिटरी नॅपकीन वापरायला हवे. ते कसे वापरायचे ? त्याची गरज का आहे? याचे त्यांना महत्व पटवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी आई- मोठी बहिण किंवा स्वयंसेवी संस्थांनी पुढे आले पाहिजे.

    स्त्री आणि पुरुषाला जन्माला घालताना परमेश्वराने कोणत्याही अटी ठेवलेल्या नाहीत त्या समाजाने निर्माण केलेल्या आहेत. आजच्या युगात आपण हे जोखड फेकून दिले पाहिजे. स्त्रीच्या शरिरात बदल झाल्याशिवाय प्रजननाचे नैसर्गिक चक्र पूर्ण होणार नाही. मुलगी उपवर होणे, तिला पाळी येणे, ती गरोदर राहणे, हे निसर्गाने तयार केलेले क • आहे. आणि हे चक्र असेच सुरु राहणे गरजेचे आहे. त्यामुळे या काळात स्त्रीयांना मिळणाऱ्या हिन वागणूकीला पाळी संदर्भातल्या त्या जुनाट रुढी परंपरांच्या बेड्यांना खरे तर कधीच मोडून टाकण्याची किंवा सोडून देण्याची गरज होती. पण ही संधी आणि वेळ अजूनही गेलेली नाही. या… आपण उद्याचे भविष्य जन्माला घालणान्या आजच्या वर्तमानाला तितक्याच पवित्रतेने स्विकारूयात आणि त्याचा सन्मान करूयात. याबाबतीत

    प्रा. रवी दांडगे यांची ही कविता खूप काही सांगून जाते.

    ती येते अन कुणालाही काही न कळू देताच निघून ही जाते,

    ‘ती’ येते तेव्हा शहाणपण येतं

    पण बालपण मात्र निघून जाते, पण, तिच्या बद्दल मात्र कायम मौनच धरले जाते.

    SEX सारख्या गोष्टींवर खुलेआम बोलले जाते

    स्त्रीला कायम मांगल्याचा ठेवा मानले जाते पण तिच्या येण्याने चार-पाच दिवसांसाठी तिला वाळीतच टाकले जाते, ‘ती’ स्त्रीत्वाची ओळख मानली जाते. वा बाईला आईपण नाही, ‘अडचणच म्हटले जाते. “अडचण च म्हटले जाते..

                                                                                                                                                           

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Sardar Vallabhbhai Patel : “राष्ट्राच्या एकतेचा अध्वर्यू — सरदार पटेलांना स्मरणांजली”

    October 30, 2025

    Reading Inspiration Day : वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रासंगिक लेख : जपू या वाचन संस्कृती : काळाची गरज

    October 14, 2025

    Firecracker-Free Diwali : लेख… फटाकेमुक्त दिवाळी : पर्यावरण रक्षणास लावा हातभार

    October 14, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.