साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळवून त्यातून मनोरंजन व समाज प्रबोधन देखील व्हावे या उद्देशाने आयोजित केलेल्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलनास चांगला प्रतिसाद मिळवून उत्साहात पार पडले.कार्यक्रमाचे योग्य नियोजन केल्या बद्दल मान्यवरांनी कौतुक केले. दि. १७ फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी ७ वाजता मीरा लॉन्स या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या डॉ प्रशांत गोवर्धने,माजी सैनिक तुषार खरात,विलास घुले,विजय गडाख,परशराम कंक्राळे,सचिन कंक्राळे या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व द्वीप प्रज्वलनाने करण्यात कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्राच्या मराठमोळ्या लावण्या,जेजुरीच्या खंडेरायाचा जागर,शिवजयंतीची गीते,नाटके, भारुड,लावण्या,हिंदी चित्रपटातील गाणी,देशभक्तिपर गीत,सरस्वती वंदना,गणेश वंदना,आदिवासी नृत्य,देशभक्तीपर,
शेतकरी नृत्य,कोळी नृत्य,शंकर वंदना,दहीहंडी उत्सव, घूमर ,गोधळ,तसेच आई आणि मुलांचे नृत्य,भांगडा,शिव वंदना असे वेगवेगळे नृत्य आविष्कार सादर करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापिका प्रिया कंक्राळे,विश्वस्त मंगेश बडे,शाळेचे शिक्षक वृंद मेघा चव्हाणके,बालाजी बोरस्ते ,दीप्ती विप्रदास,गायत्री टर्ले, शितल टर्ले,रजनी चव्हाण,ज्योती सूर्यवंशी,अंजली सोनवणे,रश्मी पुराणिक,माधुरी टर्ले,अर्चना सूर्यवंशी, सुवर्णा भोज,रोहिणी जाधव यांनी प्रयत्न केले.