शहरात कुत्र्यांचा हैदोस, नगरपालिकेचे दुर्लक्ष
साईमत/यावल/प्रतिनिधी :
शहरात जुन्या भुसावळ नाक्याजवळ माजी नगराध्यक्ष शिर्के यांच्या घराजवळ बीएसएनएल कार्यालयासमोर मोकाट श्वानांनी एका अल्पवयीन मुलीसह दोन जणांना चावा घेतला. त्यामुळे संपूर्ण यावल शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
जुन्या भुसावळ नाक्याजवळ माजी नगराध्यक्ष शिर्के यांच्या घराजवळ बीएसएनएल कार्यालयासमोर प्रशांत मनोहर बर्गे (वय ४२), माऊ मयूर कानडे (वय ६), राजू बळवंत देशमुख (वय ४८) अशा तीन जणांना त्या भागातील मोकाट श्वानांनी चावा घेतला. त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरू केला आहे. यावल शहरात ठिकठिकाणी मोकाट श्वान आले कुठून..? मोकाट श्वान हे मोटर सायकल चालकांच्या मागे सुसाट वेगाने धावून चावा घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
नगरपालिकेने तात्काळ कारवाई करावी
शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या मागे श्वान धावत असल्याने पालक विद्यार्थी व इतर नागरिकांमध्ये मोठे घबराट निर्माण झाली आहे. याकडे यावल नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे यावल नगरपालिकेने तात्काळ कारवाई करावी, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.