साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
भरधाव खासगी बसने राष्ट्रीय महामार्गवर वडनेर भोलजीनजीक पुलाजवळ दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी, १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. राष्ट्रीय महामार्गावर वडनेर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वडनेरजवळ एआर ०१.ज.७७४१ क्रमांकाच्या खासगी बसने एम एच २८ बीएस ७८२१ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. खासगी बसने धडक दिल्याने भीषण अपघात होऊन अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतक जळगाव खान्देश जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी ओम साई फाउंडेशन व नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशन रुग्णवाहिकासह घटनास्थळी पोहचून अपघात मृत पावलेल्या मोटरसायकल स्वारांना नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. घटनास्थळी विलास निंबोळकर, कृष्णा नालट, अश्विन फेरण, राजु बगाडे आदींनी धाव घेतली होती. तपास पोलीस करीत आहेत.