साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील शेतकरी संघाची निवडणूक लागलेली आहे. त्यात पंधरा जागांसाठी ६३ उमेदवारांनी अर्ज भरले आहे. येत्या २४ जानेवारी रोजी माघारीसाठी अंतिम मुदत असून सर्व पक्षांनी अर्र्ज भरले आहे. निवडणुकीसाठी पाचोरा तालुक्याचे आ.किशोर पाटील आणि माजी आ.दिलीप वाघ यांनी युती केली आहे. त्यामध्ये माजी आमदार दिलीप वाघ यांनी नऊ उमेदवार उभे केले आहे. आ.किशोर पाटील यांचे सहा उमेदवार आहे. तसेच वैशाली सूर्यवंशी आणि अमोल शिंदे यांनीही पंधरा जागेसाठी अर्ज भरले आहे.
माजी आमदार दिलीप वाघ यांच्या गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या. त्यानंतर दिलीप वाघ आणि आ. किशोर पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की, शेतकरी हितासाठी शेतकी संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू. बिनविरोध झाल्यास अधिक आनंद निवडणूक लागल्यास आमच्या गटाचे १५ चे १५ उमेदवार निवडून येतील, असे दिलीप वाघ आणि विद्यमान आ.किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी दोन्ही गटाचे उमेदवार, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.