Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»एकाच कुटुंबातील तिघांनी केले विषप्राशन! बापाचा मृत्यू तर आई व मुलाची प्रकृती चिंताजनक
    क्राईम

    एकाच कुटुंबातील तिघांनी केले विषप्राशन! बापाचा मृत्यू तर आई व मुलाची प्रकृती चिंताजनक

    SaimatBy SaimatApril 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  
    जळगाव तालुक्यातील वडली येथे एकाच कुटुंबातील तीन जणांनी विषारी औषध घेतल्याची धक्कादायक घटना गुरूवारी ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. यातील बापाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मुलगा आणि आईची प्रकृती गंभीर आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वडली गावात नारायण दंगल पाटील (वय-६६) हे आपल्या पत्नी भारती नारायण पाटील ( वय – ५५ ) आणि मुलगा गणेश नारायण पाटील (वय-३३) याच्यासोबत वस्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून पाटील कुटुंबिय तणावात होते. गुरूवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान नारायण पाटील, त्यांची पत्नी भारती पाटील आणि मुलगा गणेश पाटील यांनी तिघांनी घरात असतांना विषारी औषध सेवन केले. त्यांनतर अत्यवस्थ वाटू लागल्याने गणेशने गावात राहणारा मित्र श्यामला फोन करून घरी येणाचे सांगितले. त्यानुसार श्याम हा घरी गेल्यावर आईवडीलांसह मुलगा गणेश हे तिघे गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत दिसून आले. श्यामने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले.
    तिघांपैकी नारायण दंगल पाटील यांचा उपचारादरम्यान सकाळी १० मृत्यू झाला तर त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहेत. तिघांना अचानकपणे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थ व नातेवाईकांनी जिल्हा शासकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ तलाठी कार्यालयाचे ४२,५६० रुपयांचे वीज बिल थकीत

    March 14, 2026

    Jalgaon:एमआयडीसीत थकबाकीदारांविरुद्ध जोरदार कारवाई, दोन कंपन्यांना तातडीने सील

    March 14, 2026

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.