Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»भुसावळात तीन घरे कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली
    भुसावळ

    भुसावळात तीन घरे कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 25, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पडक्या घरांचा नगर परिषदेने सर्व्हे करून नागरिकांना दिलासा द्यावा

    साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :

    शहरातील गजानन महाराज मंदिराजवळील साईचंद्र नगरमध्ये रविवारी, २५ ऑगस्ट रोजी तीन इमारती दुपारी कोसळल्याने शहरात खळबळ उडाली. मात्र, या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी अनेकांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. अशा प्रकरणाची नगर परिषद प्रशासनाने दखल घेऊन शहरातील मुख्य नागरी वसाहत व मार्गावरील धोकेदायक इमारती जमीनदोस्त करण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.

    सविस्तर असे की, सतारे शिवारातील गजानन महाराज मंदिराजवळील साईचंद्र नगरमध्ये सततच्या पावसामुळे जमीनीचा भराव वाहुन गेल्याने दुपारी तीन वाजेदरम्यान भुसख्खनामुळे घरांची पडझड झाली. त्यात तीन रहिवाशी घरांचा समावेश होता. घराचे अंदाजे १५ ते २० लाखांचे व घरातील मौल्यवान गृहोपयोगी वस्तुचे अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये तीनही कुटुंबाचे नुकसान झाले आहे. त्यात चंद्रकला रमेश दांडेकर आणि मनोज रमेश दांडेकर यांचे डुप्लेक्स आरसीसी असलेले पक्के बांधकाम पडून गृहोपयोगी वस्तूंचे पूर्णत: नुकसान झालेले आहे. पंचानी पाच लाख रुपयांपर्यंत पंचनामा केला आहे. विद्या चंद्रकांत चौधरी आणि विराज चंद्रकांत चौधरी यांचे डुप्लेक्स आरसीसी असलेले पक्के बांधकाम पडून झालेल्या नुकसानीत अंदाजे चार ते पाच लाखांचे नुकसान झालेले आहे. तसेच रुख्मिणी प्रवीण नरवाडे यांचे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याबाबत पंचानी नमूद केलेले आहे.

    महसूल विभाग यांच्याकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर केलेला आहे. तसेच नगरपालिकाकडून मलबा हटविण्याचे व पडझड झालेल्या कुटुंबाचे तात्पुरते स्वरुपात लोणारी मंगल कार्यालय येथे राहणे, खाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याठिकाणी नगरपालिकाचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, नगरपालिका कर्मचारी, आपत्ती व्यवस्थान, बचाव पथक अग्नीशामक दलाचे कर्मचारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रफुल्ल कांबळे, तलाठी नितीन केले, पवन नवगाळे तलाठी तळवेल, मंगेश पारीसे कोतवाल, जितेश चौधरी यांची उपस्थिती होती.

    सुरक्षितस्थळी जाण्याबाबत दिल्या तोंडी सूचना

    घराच्या दक्षिण बाजुस लागुन असलेले घर विजय हरी सोनवणे, किशोर एकनाथ सपकाळे, फिलीप्स शिरीष नवगीरे, दीपक रतीलाल सोनवणे, अविनाश विष्णु खडसे, भिकन पंडीत पाटील, अत्तरदे असे सात घरे आणि पूर्व बाजुस असलेले पदमालय अपार्टमेंटमध्ये २४ फ्लॅट आहे. १७ फ्लॅटसमध्ये रहिवास आहे. त्यात एस.ए.गुप्ता, के.जी.बऱ्हाटे, एस.चक्रबोटी, जी.एस.सांळुके, जी.डी.बोरकर, एस.एस.तडवी, आर.एस.काटोले, डी.एस.व्यास, एस.एम.चव्हाण, एस.ए. सपकाळे, व्ही.आर.मुऱ्हेकर, ए.डी.तायडे, व्ही.एम.सोनवणे, ए.डी. सोनवणे, एन.बी.पवार, जी.आर.तडवी, आर.एम.तडवी यांचे फ्लॅट असुन इतर पाच फ्लॅटस रिकामे आहे.

    अपार्टमेंटच्या उत्तर बाजुस असलेल्या भिंतीस तडे पडून इमारत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपार्टमेंटमधील सर्व रहिवाशींना नुकसानीचा धोका आहे. संबंधित व्यक्तींना सुरक्षितस्थळी जाण्याबाबत तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. नगर पालिकाकडून लोणारी मंगल कार्यालय येथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.